अवैध दारू विक्री प्रकरणी रत्नागिरीत दोन ठिकाणी कारवाई

रत्नागिरी:- तालुक्यातील कोळीसरे व शहरातील बेलबाग येथे अवैधरित्या गावठी दारू बाळगणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे. जयगड व रत्नागिरी शहर पोलिसांकडून शनिवारी ही धडक कारवाई करण्यात आल़ी. यावेळी दोन्ही संशयितांकडून अवैध दारू पोलिसांनी हस्तगत केल़ी.
जगदीश रामचंद्र सावंत (45, ऱा गडनरळ बौद्धवाडी) व आकाश सुनील गीते (36, ऱा बेलबाग, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़.

जयगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळीसरे येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार 18 मार्च रोजी पोलिसांकडून कोळीसरे धनगरवाडी येथे छापा टाकण्यात आल़ा. यावेळी जगदीश सावंत याच्या ताब्यात पोलिसांना अवैध गावठी दारू आढळल़ी. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर रत्नागिरी शहरातील बेलबाग येथे अवैधरित्या दारू बाळगणाऱ्यावरही छापा टाकून कारवाई करण्यात आली. 18 मार्च रोजी ही कारवाई करण्यात आल़ी. त्याच्या ताब्यातून 4 लिटर गावठी दारू पोलिसांनी हस्तगत केल़ी दोन्ही आरोपींविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम 65 ई नुसार कारवाई केल़ी.