हातखंबा येथे बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तरूणाचा मृत्यू

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे बेधुद्ध अवस्थेत सापडलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा. मोहम्मद अल रहमान (35) असे या मृताचे नावे आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े तरी या मृताबद्दल कुणाला काही माहिती असल्यास ग्रामीण पोलिसांशी संपर्प साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आह़े.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेबुवारी 2023 रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे तरूण बेशुद्ध अवस्थेत आढळला होत़ा यावेळी स्थानिकांनी त्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केले होत़े 3 मार्च 2023 रोजी या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झल़ा मोहम्मद याच्या नातेवाईकांचा अद्याप शोध घेण्याचा प्रयत्न रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आह़े.