घरातील रोख रक्कम, दागिने चोरणाऱ्या चोरट्याला न्यायालयीन कोठडी 

रत्नागिरी:- शहरातील खालचा फगरवठार येथील घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवणार्‍या संशयित तरुणाला न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

 विजय राजाराम वाळवे (34, रा.खालचा फगरवठार, रत्नागिरी ) असे संशयिताचे नाव आहे.ही घटना 20 फेब्रुवारी रोजी स.8 ते 24 फेब्रुवारी रोजी स.8 वा. कालावधीत घडली होती.

 त्याच्या विरोधात प्रज्ञा परशुराम पाष्टे (47,रा.खालचा फगरवठार, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,विजयने त्याच्यावर पाळत ठेऊन त्या घराबाहेर गेल्यानंतर खीडकीला लावलेल्या छत्रीमधील चावी घेऊन घराचे कुलूप उघडले.त्यानंतर घरातील लॉकरमधून सोन्याचे मंगळसूत्र,नेकलेस, अंगठ्या,चेन, कर्णफूल आणि रोख 10 हजार रुपये असा एकूण 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.याप्रकरणी शहर पोलिसांनी विजय अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.