खंडाळा येथे रंगणार तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार; मल्हार प्रतिष्ठानकडून आयोजन

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा येथे मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. येथील मल्हार प्रतिष्ठान कडून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २ मार्च ते ४ मार्च या कालावधीत ह. भ. प. शरद दादा बोरकर क्रीडा नगरी
खंडाळा येथे ही स्पर्धा होणार असून स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या संघाला रोख रक्कम आणि मानाचा चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत ग्रामीण भागातील संघाना देखील आपला खेळ दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

वाटद खंडाळा येथील उद्योजक तथा मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष भालेकर यांच्याकडून या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मल्हार प्रतिष्ठान कडून दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कबड्डी स्पर्धेसह विविध सामाजिक आणि लोकपयोगी कार्यक्रमात मल्हार प्रतिष्ठान अग्रेसर असते.

यावर्षी देखील २ मार्च पासून खंडाळा येथे मॅटवरील कबड्डी स्पर्धा रंगणार आहेत. या कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील अनेक नामवंत संघ सहभागी होणार आहे. खंडाळा येथे ही नाईट स्पर्धा होणार आहे. २ मार्च ते दि. ४ मार्च २०२३ या कालावधीत या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येतील. जवळपास २० संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेत ग्रामीण भागातील संघ देखील सहभागी होणार आहेत. ग्रामीण भागातील आठ संघ सहभागी होणार असून या गटात विजेत्या संघाला देखील रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या पुर्व परवानगीने या स्पर्धेचे नियोजन मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आल्याचे मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष भालेकर यांनी सांगितले. या स्पर्धेत विजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तरी तालुक्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी या भव्य अशा स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचे कौतुक करावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिषजी भालेकर आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.