फुणगुस येथे तरुणाचा शॉक लागून मृत्यू

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथे 17 वर्षीय तरुणाला विहिरीतील पंप जोडताना शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (सोमवार 27 फेब्रुवारी ) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. 22 वर्षाच्या या तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आर्यन दिलीप पांगरकर (17, फुणगुस, संगमेश्वर) असे या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, सोमवारी सकाळी 11 वाजता आर्यन हा विहिरीवर इलेक्ट्रिक पंपाद्वारे पाणी सोडण्याचे काम करत होता. यावेळी त्यांच्यासोबत आई होती. मात्र याच वेळी विजेचा शॉक लागल्याने तो जमिनीवर कोसळला. मुलाला शॉक लागताच आईने आरडा ओरडा करायला सुरुवात केली. ग्रामस्थ त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला सोडवण्यात आले. लगेचच फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेची माहिती संगमेश्वर पोलिसाना मिळताच संगमेश्वर घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह संगमेश्वर येथील रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.