सख्ख्या भावाला बॅटने मारहाण; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- अज्ञात कारणातून सख्या भावाला बॅटने मारहाण करून बेशुद्ध केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार 23 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वा. सह्याद्रीनगर येथे घडली आहे.

श्रीकांत दत्तात्रय मराठे (44,रा. गुरुविहार सोसायटी सह्याद्रीनगर, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात अमित दत्तात्रय मराठे (48,,रा. गुरुविहार सोसायटी सह्याद्रीनगर, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी अमित मराठे कामावरून घरी आले. जेवण बनवून ते आपल्या मुलीसोबत बोलत असताना श्रीकांत बॅट घेऊन तिथे आला आणि त्याने अमित यांना मारहाण केली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.