निवळी मालपवाडी येथील बेपत्ता वृध्दाचा सापडला मृतदेह

रत्नागिरी:- निवळी मालपवाडी येथील बेपत्ता वृध्दाचा 18 दिवसानंतर मृतदेह आढळून आला. दत्ताराम सखाराम मालप (70, निवळी, मालपवाडी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

ते 3 फेब्रुवारी रोजी जंगलमय भागात गुरे चरवण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळी घरी न परतल्याने मुलगा व इतर नातेवाईकानी त्यांचा शोध सुरु होता. ते आढळून आले नाहीत. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी ते बेपत्ता असल्याची फिर्याद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. रविवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हातखंबा डांगेवाडी येथील जंगलमय भागात 18 दिवसांनी कुजलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला.