तरवळ येथे दुचाकी अपघातात पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

रत्नागिरी:- निवळी-जयगड मार्गावरील तरवळ येथे दुचाकी अपघात प्रकरणी चालकावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास रविश्चंद्र वझे (60, ऱा सांडेलावगण वाकणवाडी जयगड) असे संशयिताचे नाव आह़े. 13 फेब्रुवारी रोजी अपघात घडला होत़ा. यामध्ये विलास यांची पत्नी वर्षा विलास वझे यांचा मृत्यू झाला होत़ा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास वझे हे 13 फेबुवारी 2023 रोजी  दुचाकी (एमएच 08 एक्स 817) वर पत्नी वर्षा हिला मागे बसवून निवळी जयगड रस्त्याने जात होत़े. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तरवळ घोडखिंड येथे रस्त्यावरील खड्ड्यामध्ये दुचाकी जावून अपघात झाला होत़ा. यामध्ये विलास यांची पत्नी वर्षा रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल़ी त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केल़े.

याप्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याचा ठपका ठेवत दुचाकीचालक विलास वझे याच्याविरूद्ध भादवि कलम 279, 337,338 व मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केल़ा. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े