जिल्ह्यातील आठ कातळशिल्प राज्य संरक्षित करण्याचा अंतिम प्रस्ताव 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील ८ कातळशिल्प राज्य संरक्षित करण्याचा अंतिम प्रस्ताव रत्नागिरी पुरातत्व विभाने शासनाकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. राज्य संरक्षित करण्यात येणार्या बारसू, भगवतीनगर,चवे,  देवीहसोळ , कापडगाव,कशेळी , उक्षी, वाढारुणदे या रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे. अंतिम अधिसूचना काढल्यानंतर आठही कातळ  शिल्पे राज्य संरक्षित होणार आहेत.

कोकणात आढळून येत असलेली कातळशिल्प ही जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ  सड्याच्या पृष्टभागावर कोरलेली आहेत. ही शिल्प एका विशिष्ट जागेत न आढळतात समुद्र किनार्या लगत सुमारे ३०० कि. मी. अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात. कोकणातील या कातळावर अश्ययुगी संस्कृती रुजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणार्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे त्यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ हजार २०० पेक्षा अधिक कातUशिल्पांचा शोध  लागला आहे. काही शिल्पाच्या भोवती गूढकथा परंपरा दिसतात. या कातUशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास संरक्षण आणि जतन होऊ शकते. म्हणून सुधीर रिसबूड आणि त्यांच्या सहकार्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.

सुरुवातील पुरातत्व विभागाने १० कातUशिल्पांचा प्रस्ताव राज्य संरक्षित करण्यासाठी पाठवला होता. त्यातील २ कातळशिल्पाच्या जागेला अक्षेप घेण्यात आल्याने उर्वरित आठ कातळ शिल्पांची पहिली अधिसुचना काढण्यात आली होती. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर आता अंतिम अधिसुचनेसाठी आठ कातळशिल्पांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.त्यामध्ये राज्य संरक्षित करण्यात येणार्या बारसू, भगवतीनगर,चवे,  देवीहसोळ, कापडगाव,कशेळी, उक्षी, वाढारुणदे या रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे. अंतिम अधिसूचना काढल्यानंतर आठही कातळ शिल्पे राज्य संरक्षित होणार आहेत. तर राज्य शासानाच्या पर्यटन विभागासह पुरातत्व विभागामार्फत त्या परिसराचे सुशोभिकरण व संवर्धन केले जाणार आहे. तसेच त्याठिकाणी जाणारे रस्ते, पर्यटकांना आवश्यक मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने त्यामुळे पर्यटन वाढला प्राधान्य मिUणार आहे.