मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- दुचाकीवर ट्रिपल सीट घेऊन बेदरकारपणे गाडी चालवत अपघात करत दुचाकीवर मागे बसलेल्या एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात शनिवार 21 जानेवारी रोजी रात्री 10 वा. तिवराट ते कोतवडे जाणाऱ्या रस्त्यावरील सनगरेवाडी येथे घडला होता.

कमल मीने टमट्टा (26,मूळ रा. नेपाळ सध्या रा. शिरगांव आडी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे. शनिवारी रात्री कमल आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एए-8543) वरून कुमार रणबहादुर बिस्वकर्मा (26) आणि हरीश उर्फ हस्तबहादूर विरबहादूर बिस्वकर्मा (32) या दोघांना घेऊन तिवराट ते कोतवडे असा जात होता. ते सनगरेवाडी येथे आले असता कमलचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. यात कुमार रणबहादुर बिस्वकर्मा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यूस कारणीभूत ठरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत