रत्नागिरी रेल्वे स्थानकावर बेशुध्दावस्थेत आढळलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी :- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर बेशुध्दावस्थेत आढळलेल्या अनोळखी प्रौढाचा रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना 20 जानेवारी रोजी घडली. या प्रौढाचे वय अंदाजे 50 वर्षे असून त्यांचे नाव, गाव समजू शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलीस सागर पाटील यांना हा अनोळखी इसम बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. त्यांनी उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मात्र 20 जानेवारी रोजी त्या अनोळखी प्रौढाचा मृत्यू झाला. या इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.