नाचणे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरानजिकच्या नाचणे येथे तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार सायंकाळी उघडकीस आली .

सौम्यक अनंत जाधव ( १९ , रा . माऊली अपार्टमेंट गोडाऊन स्टॉप नाचणे , रत्नागिरी ) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे . गुरुवारी सायंकाळी घरात कोणीही नसताना सौम्यकने सिलिंग फॅनला गळफास घेतला . सायंकाळी त्याची आई कामावरून घरी आली असता तिला सौम्यक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला . याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला .