खेड येथे एस.टी बसची दुचाकीला धडक; दोघेजण जखमी, बस चालकावर गुन्हा

खेड:- तालुक्यातील खोपी येथील एका वळणावर एसटी बसने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाल्याची घटना 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वा. च्या सुमारास घडली. या अपघातप्रकरणी प्रवेश ज्ञानबा भगव (43, ड्रायव्हर, एसटी डेपो, खेड) असे गुन्हा दाखल बस चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सूर्यकांत चंद्रकांत भोसले (26, लोटे, खेड, शिरगाव देवूळवाडी) याने खेड पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सूर्यकांत भोसले हा आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन काका यशवंत कृष्णा भोसले यांना घेउन कुळवंडी शिवाजीनगर मार्गे लोटे एमआयडीसीकडे जात होता. सकाळी 8 वा. च्या सुमारास खोपी नदीच्या पुलाच्या पुढे असलेल्या तांबडवाडीजवळील एका वळणावर सूर्यकांत हा आला असता समोरुन भरधाव वेगाने आलेल्या बस (क्रमांक 20 बी एल 3301) याने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सूर्यकांत भोसले आणि काका यशवंत भोसले हे दोघे जखमी झाले.

या अपघाताची फिर्याद सूर्यकांत याने खेड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी बस चालक प्रवेश ज्ञानबा भगव याच्यावर भादविकलम 279, 337 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे.