ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी हौस आली अंगलट

मित्राची नेलेली दुचाकीच गेली चोरीला

संगमेश्वर:- ऑर्केस्ट्रॉ पाहण्यासाठी मित्राची गाडी नेण्याची हौस एकाच्या चांगलीच अंगलट आली आहे. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील साखरपा येथील सती माता रोडवर पार्क करून ठेवलेली दुचाकी चोरीस गेल्याची घटना ५ जानेवारी रात्री १० ते ६ जानेवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद ज्ञानरल विठ्ठल कांबळे (२४, शाहुवाडी कोल्हापूर) याने देवरुख पोलीस ठाण्यात दिली.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानरत्न कांबळे हा मित्र चेतन पाटील याची स्प्लेंडर (एमएच ०९ बीजे २१७२) घेऊन साखरपा येथे ऑर्केस्ट्रॉ पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने सतीमाता मंदिरासमोरील रत्नागिरी कोल्हापूर हायवेवर पार्क केलेली मित्राची स्प्लेंडर मोटरसायकल चोरीस गेल्याची निदर्शनास आले. यबाबतची फिर्याद ज्ञानरत्न याने देवरुख पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर सावविकलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.