रत्नागिरी कोकणनगर येथे पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया

रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर येथे टाकण्यात आलेली पाईप लाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. नगर परिषदेच्या भोंगळ कारभार असून वारंवार होणाऱ्या या घटनेकडे नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

 रत्नागिरीत महिनाभरापूर्वी मारुती मंदिर येथेही अशाचप्रकारची पाईपलाईन फुटून हजारों लीटर पाणी वाया गेले होते. त्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करुन नगर परिषदेने ते व्यवस्थित केले. मात्र आता कोकणनगर येथे पाईपलाईन फुटल्याने हजारों लीटर पाणी वाया जात आहे. वारंवार अशाप्रकारे पाईप लाईन या ठिकाणी फुटते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. हे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने वाहन चालकांच्या गाडीतून उडणारे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडून नाहक वास सहन करावा लागत आहे.

 रत्नागिरीत वारंवार अशाप्रकारे पाईपलाईन फुटतात मात्र नगर परिषद मात्र तात्पुरता मुलाला लावून पडता टाकण्याचा प्रयत्न करते. मे महिन्यात मात्र याच पाण्यासाठी दिवसाआड पाणी नागरिकांना द्यावे लागते. मात्र असे वाया गेलेले पाणी यावर नियंत्रण मिळवण्यात परिषदेला कधी यश मिळवता येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.