ब्युटी आर्ट लेडीज पार्लरचा हिंदू कॉलनी येथे शानदार शुभारंभ

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील हिंदू कॉलनी येथे ब्युटी आर्ट लेडीज पार्लरचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा सलोन आणि स्पा संघटनेच्या अध्यक्षा अर्चना पुण्णतळीकर आणि सदस्य नीलिमा माजगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

रेवती सावंत आणि अपेक्षा सावंत या दोघींनी हिंदू कॉलनी येथे या नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. २० जानेवारी पासून ब्युटी आर्ट लेडीज पार्लर ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे. २० जानेवारी रोजी या पार्लर चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. जिल्हा सलोन आणि स्पा संघटनेच्या अध्यक्षा अर्चना पुण्णतळीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या पार्लर मध्ये महिलांना आयब्रो, ब्लिच, फेशियल, वॅक्सिंग, बॉडी स्पा, स्किन पॉलिशिंग, हेअर कट, हेअर कलर, हेअर स्पा, मेहंदी हाईलाईट, मेनिक्युर, पेडिक्युर, हेअर स्मुथनिंग आणि आयनिंग आधी सुविधा पुरवल्या जात आहेत.