दापोलीत दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

दापोली:- दापोली येथून खेर्डीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीसह गटारात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रसाद प्रकाश बुरटे (35, पांढरीवाडी, खेर्डी, दापोली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना 2 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.  

रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे लक्ष न देता अतिवेगाने व बेदरकारपणे गाडी चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यापकरणी दुचाकीस्वार प्रसाद बुरटे याच्यावर भादविकलम 304 (अ), 279, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.