उद्या होणार महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन

मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसनिमित्ताने आयोजन

रत्नागिरी:- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वामी माऊली बहुउद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना व रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या मान्यतेने ७२ व्या महाराष्ट्र राज्य अजिक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. २५ व २६ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा सावरकर नाट्यगृह येथे होणार आहे.

७२ व्या राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेचे यजमानपद रत्नागिरीला मिळाले आहे. २५ व २६ डिसेंबर रोजी ही स्पर्धा रत्नागिरीत होणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या स्वामी माऊल बहुउद्देशी सेवा या ट्रस्टमार्फत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उद्यागमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही स्पर्धा सावरकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे.

या स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असून रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ सकाळी ९ ते दुपारी २- उंची मापन, दुपारी ३:०० ते सायंकाळी ४:०० – पंच शिबिर, सायंकाळीं ४:०० ते सायंकाळी ६:०० – महाराष्ट्र उदय, सायंकाळी ६:०० ते रात्री ७:३० – महाराष्ट्र श्रीमान, रात्री ७:३० ते रात्री ९:०० – महाराष्ट्र किशोर या स्पर्धा होणार आहेत.

सोमवार दिनांक २६ डिसेंबर २०२२, रोजी दुपारी २:०० ते सायंकाळी ४:०० – महाराष्ट्र कुमार सायंकाळी ४:०० ते सायंकाळी ६:०० – महाराष्ट्र मेन्स फिटनेस, सायंकाळी ६:०० ते रात्री ८:०० – महाराष्ट्र श्री स्पर्धा होणार आहे. रात्री ८ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत वाढदिवस अभिष्टचिंतर सोहळा होणार असून रात्री ९ वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.