ठरलं! जिल्ह्यातील 27 विद्यार्थी इस्त्रो तर 9 विद्यार्थी नासाला देणार भेट

रत्नागिरी:- अंतराळाचा अभ्यास करणार्‍या नासा, इस्त्रो या संस्थांच्या भेटीसाठी ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांमधून संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण होण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरून पात्र ठरलेल्या 90 विद्यार्थ्यांपैकी परिक्षेतून एकूण 27 विद्यार्थी अंतिम निवडीसाठी पात्र ठरले आहे. त्यामध्ये 27 विद्यार्थी ‘इस्त्रो’ तर त्यातील 9 विद्यार्थी ‘नासा’ या संस्थांच्या भेटीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून निवडण्यात आले आहेत.

अंतराळाचा अभ्यास करणार्‍या नासा, इस्त्रोसारख्या संस्थांना भेटी देण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून हाती घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या 251 केंद्रातील पावणेतीन हजार शाळांमधील 30 नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या चाळणी परिक्षेला 27 हजार विद्यार्थ्यांपैकी 23 हजार 719 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 2 हजार 640 विद्यार्थी बीटस्तरीय परिक्षेसाठी निवडण्यात आले. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांमधून संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा परिषदेने नासा, इस्रो भेटीचा उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, अतिरिक्त सीईओ परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्यासह संदीप कडव, मुरकुटे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी विद्यार्थी निवडीचे नियोजन केले. या संस्थांना भेटीसाठी घेण्यात आलेल्या बीटस्तरासाठी 2600 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्या परीक्षेतून तालुकास्तरासाठी 560 विद्यार्थी पात्र ठरले. तालुकास्तरावर झालेल्या परीक्षेतून जिल्हास्तरासाठी 90 विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. मुलाखत स्वरूपात होणारी निवड परीक्षा 20 डिसेंबरला जिल्हा परिषदेत ठेवण्यात आली होती. ही चाचणी घेण्यासाठी विज्ञान विषयातील 15 तज्ञ अध्यापक नियुक्त केले होते. त्यांची पाच पथके तयार करून त्यांनी नासासाठी 9 तर इस्रोसाठी 27 विद्यार्थी निवडले. यामध्ये विद्यार्थिनींचाही समावेश आहे. एका पथकात 3 तज्ञांचा समावेश करण्यात आला होता. पारदर्शकतेसाठी या प्रकियेचे व्हिडिओ शूटिंग केले गेले. या निवडीसाठी विद्यार्थ्यांची मुलाखत स्वरूपात 100 गुणांची परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर लगेचच निवडलेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली. अमेरिकेन ऍम्बिसिकडून व्हिसासाठीची परवानगी प्राप्त झाली की नासा भेटीसंदर्भातील तारखा निश्र्चित केल्या जाणार आहेत. तोपर्यंत विद्यार्थी निवड प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात
आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

नासा व इस्त्रो या दोन संस्थांच्या भेटीसाठी निवडण्यात आलेले विद्यार्थीः- मंडणगड- प्रभुती संतोष घागरूम (इ. 7 वी, शाळा-कोन्हवली, मंड), दापोली- धनश्री संजय जाधव (इ. 7 वी, शाळा शिरसोली नं.1,), खेड-वेदांत विठ्ठल मोरे (इ. 7 वी, पाथमिक शाळा देवघर, निवाचीवाडी), चिपळूण- दक्ष दिनेश गिजये (इ. 6 वी, जि.प.शाळा पाग मुलांची), गुहागर-सोनाली मोहन डिंगणकर (इ. 7 वी, जि.प.शाळा काजुर्ली न.2), संगमेश्र्वर- आरोही दिनेश सावंत (इ.7 वी, जि.प.शाळा ओझरखोल), रत्नागिरी- वेदांत बाबराव सनये (इ.7वी, जि.प.शाळा कुवारबाव महालक्ष्मीनगर), लांजा- आशिष अनिल गोबरे (इ.7 वी, जि.प.शाळा शिरवली), राजापूर- भूषण चंद्रकांत धावडे (इ.7वी, जि.प.शाळा पांगरे बु).

इस्त्रो या संस्था भेटीसाठी निवडण्यात आलेले विद्यार्थीः-मंडणगड- प्रभुती संतोष घागरूम (इ. 7 वी, शाळा-कोन्हवली), श्र्लोक शरद सुगदरे (इ.5 वी, प्राथमिक शाळा नुतन विद्यालय), जान्हवी लहू खापरे (इ. 7 वी, प्राथमिक शाळा शेडवई). खेड- कीर्ती केशव मुंढे (इ.6 वी, प्राथमिक शाळा असगणी नं.2), सार्थक पकाश महाडिक (इ. 6वी, प्राथमिक शाळा धामणदिवी बेलवाडी), वेदांत विठ्ठल मोरे (इ. 7 वी, प्राथमिक शाळा देवघर, निवाचीवाडी), दापोली- धनश्री संजय जाधव (इ. 7 वी, शाळा शिरसोली नं.1,), तनिष्का जयंत बोधगावकर (इ.6वी, जि.प.शाळा जालगाव नं.1), सुयश सुनील गोसावी (इ.7 वी, पाथमिक शाळा मळे), !चिपळूण- दक्ष दिनेश गिजये (इ. 6 वी, जि.प.शाळा पाग मुलांची), अभय शिवराम भुवड (इ.7 वी, जि.प.शाळा तुरंबव), इच्छा सीताराम कदम (इ.6 वी, जि.प.शाळा अनारी). गुहागर-सोनाली मोहन डिंगणकर (इ. 7 वी, जि.प.शाळा काजुर्ली नं.2), क्षितीजा शशिकांत मोरे (इ. 6वी, जि.प.शाळा वेळंब नं.1), मुस्तफा मुनव्वर शेख (इ. 7वी, जि.प.शाळा केंडश्रृंगारी उर्दु). !संगमेश्र्वर- आरोही दिनेश सावंत (इ.7 वी, जि.प.शाळा ओझरखोल), नीरज मनोज इनामदार (इ. 5वी, जि.प.शाळा तुरळ सुवरे), नितीन अनंत बोडेकर (इ. 7वी, जि.प.शाळा चाफवली नं. 1). !रत्नागिरी- वेदांत बाबराव सनये (इ.7 वी, जि.प.शाळा कुवारबाव महालक्ष्मीनगर), पेरणा दिपक भोजने (इ. 7 वी, जि.प.शाळा गोळप नं.1), साथिया संजय संते (इ.7 वी, जि.प.शाळा गोळप नं.1).लांजा-आशिष अनिल गोबरे (इ.7 वी, जि.प.शाळा शिरवली), आर्यन संजय गुरव (इ. 7वी, जि.प.शाळा वनगुळे नं.1), वेदिका सिध्दार्थ वारंगे (इ.6 वी, जिप.शाळा लांजा नं.5) राजापूर- भूषण चंद्रकांत धावडे (इ.7वी, जि.प.शाळा पांगरे बु), विनया नवनाथ जाधव (इ.5 वी, जि.प.शाळा भालावली नं.1), प्राजक्ता अनिल भोकरे (इ.6 वी, जि.प.शाळा तुळसवडे नं.1) असे समजते.