रहाटाघर येथे चाललेल्या शिवशाही बसची एसटी स्टँड समोर तीन गाड्यांना ठोकर

रत्नागिरी:- शहरातील रहाटाघर येथे चाललेल्या शिवशाही बसने तब्बल तीन गाड्यांना धडक दिली. आता काही मिनिटांपूर्वी झालेल्या अपघातानंतर एसटी बस स्थानकासमोर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

शहरातील मुख्य बस स्थानकासमोर एसटीच्या शिवशाही गाडीने तीन गाड्याना ठोकरले. ही शिवशाही बस डेपो मधून राहाटाघर कडे जात असताना एसटी बसची डिकी अचानक उघडल्याने हा अपघात झाला. या उघडलेल्या डिकी मुळे एका रिक्षाला मागून बसली व ही रिक्षा फरफटत पुढे असणाऱ्या नॅनो गाडीवर आपटली. या अपघातात दोन जणांना दुखापत झाली असून रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली असून एकेरी वाहतूक सुरू आहे.