अपघातात 7 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर गुन्हा 

राजापूर:- तालुक्यातील नाटे वाघेडी येथे कॅरी सुझुकी मालवाहतुकीच्या गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात 7 जण जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाबिर शरीफ सोलकर (40, नाणार इंगळवाडी, राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी रात्री 11.45 वा. च्या सुमारास घडली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाबिर शरीफ सोलकर हा आपल्या ताब्यातील कॅरी सुझुकी मालवाहतुकीच्या गाडीतून 15 प्रवासी घेवून रत्नागिरी ते नाणार इंगळवाडी असा चालला होता. पावस आडिवरे मार्गाने तो जात असताना नाटे वाघेडी येथे गाडीचा टायर फुटल्याने गाडी विरुध्द दिशेला साईटपट्टीवर जावून आदळली. तिथे आदळून पुन्हा रस्त्याचे मध्यभागी येवून पलटी झाली. या मोठया अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केला. यामध्ये 7 प्रवास जखमी झाले. मुस्तकिम अब्बास साखरकर, शरीफ इस्माईल सोलकर, अफान शौकत सोलकर, गणी अब्दुल कादिर मुजावर, शौकत उमर सोलकर, निसार अब्बास सोलकर सर्व राहणार नाणार हे जखमी झाले. या सर्वांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जाबीर सोलकर याच्या भादविकलम 279, 337, मोटर कायदा कलम 184, 66/192 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.