रत्नागिरी:- उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणातून तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ३ संशयितांपैकी दोघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने आज बुधवारी १० डिसेंबर पर्यंत वाढ केली. तर एकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यापूर्वी त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
महेश गंगाराम शेळके (२३, रा. शांतीनगर, रत्नागिरी), शुभम रमेश सोळंकी (२९, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) या दोघांच्या पोलिस कोठडीत १० डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली असून अक्षय विजय माने (१९ रा. गवळीवाडा, रत्नागिरी ) याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या विरोधात नागेश प्रकाश गजबार (२७ रा. कुवारबाव, रत्नागिरी ) याने तक्रार दिली होती. त्यानुसार, त्याने महेशला आपल्या गळ्यातील चेन गहाण ठेऊन १ लाख १० हजार रुपये उधारीवर दिले होते. ते परत मागितल्याच्या रागातून महेशने अन्य दोघांसोबत मिळून बुधवार ३० नोव्हेंबर रोजी रात्री पऱ्याची आळी येथे कोयतीने आणि लादीने प्राणघातक हल्ला केला होता.