ह.भ.प. शरददादा बोरकर यांचा प्रथम स्मृतिदिन समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

रत्नागिरी:- तालुक्यातील दिवंगत नामवंत नेतृत्व शरददादा बोरकर यांचा प्रथम स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी शालेय उपयोगी विविध वस्तू आणि फळे वाटप करण्यात आले.

हभप शरददादा बोरकर यांचा पाहिलं स्मृतीदिन जयगड पंचक्रोशीत समाज उपयोगी उपक्रम म्हणून बोरकरदादा यांचा परिवारा तसेच बोरकर दादा मित्र मंडळ आणि जयगडचा राजा मित्रमंडळाकडून साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हभप शरददादा बोरकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त वरवडे भंडारी शाळा क्रं. १ येथे वॉटर प्युरीफायर आणि शोकेस कपाट देण्यात आले. चाफेरी शाळेत टिव्ही तसेच वाटद जि. प.शाळेतील परस बागेत ठिबक सिंचन सुविधा पुरवण्यात आली. नांदिवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत फळांचे वाटप करण्यात आले.

अशा शालेय उपक्रमांसोबत विविध समाजउपयोगी उपक्रम देखील यावेळी राबवण्यात आले. दिवंगत दादांच्या आठवणींना उजाळा देत हे सर्व कार्यक्रम साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाला बोरकरदादा कुटुंबीय यांच्यासोबत नांदीवडे गावच्या सरपंच सौ. आर्या गडदे, उपसरपंच श्री. विवेक सुर्वे, चाफेरी शाळा व्यवस्थापनचे श्री. किरण बैकर आणि श्री. वेलणकर, प्रसाद गुरव, विलास बारगुडे, निनाद चव्हाण यांच्यासह वाटद आणि नांदीवडे गावातील मान्यवर आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. भविष्यात बोरकरदादा यांचे कुटुंबिय आणि मित्र परिवार कडून असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातील असे विवेक सुर्वे आणि बोरकर कुटुंबाकडून सांगण्यात आले.