मालगुंड येथे बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड येथून रविवारी सकाळी 8.15 वा.बेकायदेशीरपणे समुद्री वाळूची वाहतूक करणाऱ्या विरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून महिंद्रा गाडी आणि वाळू असा एकूण 1 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 

विलास शंकर सुर्वे (56), मुकेश रामप्रताप लोहरा (21, दोन्ही रा. मालगुंड भंडारवाडा, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस नाईक प्रशांत लोहळकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी हे दोघे आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो (एमएच-08-डब्ल्यू-0849) मधून बेकायदेशीरपणे 2 हजार रुपये किंमतीची अर्धा ब्रास वाळूची वाहतूक करत असताना ही कारवाई करण्यात आली.अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.