‘हर घर जल’ या अभियानांतर्गत दोनशे योजनांना मंजुरी

रत्नागिरी:- जल जीवन मिशनच्या ‘हर घर जल’ या अभियानांतर्गत जिल्हयात नव्या आणि जून्या पुनुरुज्जीवनाच्या अशा एकूण 1475 योजना प्रस्तावीत आहेत. त्यापैकी गेल्या आठवडयात 200 योजनांना मंजूरी मिळाली असून पुढच्या आठवड्यात अजून मंजुरी मिळेल, अशी माहिती जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकशारी किर्ती किरण पूजार यांनी पत्रकारांना दिली.

या अभियानांतर्गत प्रत्येक घरी पाणी पोहचवण्याचे उद्दीष्ट असून त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनुरुज्जीवन, क्षमता वाढ किंवा दुरुस्ती अशी कामे घेण्यात येत आहेत. या कामांचा  आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकताच घेतला.

जिल्ह्यात 1475 योजना राबविण्यात येत आहेत. डोंगरी भाग, कातळ जमीन आणि विखुरलेल्या वाड्या-वस्त्या यामुळे अंदाजपत्रक तयार करण्यासह प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल बनविण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यावरही मार्ग काढून कार्यवाही सुरु आहे. मागील महिन्यात 200 योजनांना प्रशासकीय मान्यता दिली गेली असून 100 योजनांना आठवडाभरात प्रशासकीय मान्यता दिली जाईल असे सीईओ पुजार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची तालुकास्तरावर तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्र वितरणासाठी आरोग्य विभागामार्फत शिबिरे आयोजित केली जात आहेत. रत्नागिरीत आयोजित शिबिरात 219 जणांची तपासणी केली गेली तर लवकरच दापोलीमध्ये शिबर घेण्यात येणार आहे. 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनी साहित्य वितरणाचे कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली.

दिव्यांग नोंदणीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. याविषयी पत्रकारांना माहिती देताना श्री. पुजार म्हणाले, गावागावात असलेल्या दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्याचे काम हाती घेण्यात आले
आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात याचे पहिले शिबीर झाले. त्यामध्ये तपासणी झालेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्रे वितरीत केली आहेत. दापोलीस अन्य तालुक्यातील उपजिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी शिबीरे घेतली जाणार आहे. गावापासून शिबीराच्या ठिकाणापर्यंत ने-आण करण्याचा खर्च हा ग्रामपंचायतीकडून केला जाणार आहे.
त्यासाठी संबंधित सरपंचांनी नियोजन करावयाचे आहे. त्यांच्या चहा-नाश्त्याचा खर्चही शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. दिव्यांगांनी फक्त शिबीराच्या ठिकाणी येऊन तपासणी करावयाची आहे. संबंधितांना प्रमाणपत्र वितरीत करणार असून भविष्यात मागणीनुसार अपंगांसाठी आवश्यक साहित्यही देण्यात येणार आहे, असे श्री. पुजार यांनी सांगितले.