जलजीवन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 137 जुन्या पाणी योजनांचे पुनरुज्जीवन 

रत्नागिरी:- जलजीवन योजनेंतर्गत  जिल्ह्यातील 137 जुन्या पाणी योजना पुनरुज्जीवित करण्यात येणार आहेत. या योजनेत जुन्याच पाणी योजनांच्या क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे. या योजनेला नव्याने गावासाठी पाण्याची सुविधा देताना योजनेच्या निकषानुसार जलजीवनच्या नव्याने केलेल्या तरतूद आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.

जलजीवन मिशन योजना सध्या ज्या गावात अस्तित्वात आहे, मात्र निकषानुसार पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, तेथे नवीन योजना करण्याऐवजी सध्याच्या अस्तित्वातील योजनांची क्षमता वाढ करण्यात येणारआहे. अशा  जिल्ह्यात 137 योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
सन 2024 पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाचे पाणी या अभियनात जलजीवनचा समावेश करण्यात आला आहे. ज्या गावात सध्या योजना अस्तित्वात असलेल्या योजना निकषानुसार पाणी पुरविण्यासाठी पुरेशा नाहीत, तेथे आवश्यक ती तपासणी करून नवीन योजना करण्याऐवजी सध्याच्या अस्तित्वातील योजनांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. अलिकडेच या योजनांचा प्रशासनाने आढावा घेताना 137 योजना नव्या क्षमतेच्या करण्याला मान्यता देण्यात आली.