तरुणांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी भविष्यात प्रयत्न: पोलीस अधीक्षक कुलकर्णी 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील तरुणाईमध्ये आत्महत्येचे प्रमाण अचानक वाढले आहे. हि गंभीर बाब आहे. क्षणीक करणातून आत्महत्या केल्या जात आहे. यापुर्वी या जिल्ह्यात आत्महत्या होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. गेल्या काहि दिवसात तरुण वर्ग आत्महत्या करण्याकडे वळत आहे. याची नेमकी करणे अध्याप स्पष्ट झालेली नाही.मात्र या आत्महत्ये मागील कारणे शोधण्याचा प्रयत्न तज्ञांच्यामाध्यमातून पोलीस दल करणार आहे. तर सर्व शासकिय यंत्रणांना सोबत घेवून सार्वजनिक स्तरावर जनजागृती मोहिम हाती घेवून तरुणाईच्या मनाचा वेध घेतला जणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

गेल्या दोन महिन्यात रत्नागिरी तालुक्यात सुमारे आठहून अधिक आत्महत्या झाल्या. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण वर्गाचा सर्वात जास्त समावेश आहे. आत्महत्येसाठी कोणतेही ठोस कारण नसतानाही तरुण वर्ग आत्महत्या करण्याकडे वळत आहे. क्षणाचाही विलंब न करता तरुण वर्ग जीवन संपविण्याचा मार्ग का अवलंबत आहे. याचा प्राधान्याने शोध घेणे आवश्यक आहे. सामाजिक दृष्टया हि बाब गंभीर आहे.

ग्रामीण भागातील तरुण वर्ग आत्महत्या करण्याकडे का वळत आहे. याचा शोध तज्ञांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न पोलीस दलाच्यावतीन करण्यात येणार आहे. आत्महत्या करण्यामागील नेमकी कारणे कोणती आहेत ? याचा शोध घेतला जाणार आहे. आत्महत्या कशा रोखता येतील याच्यावरही प्राधान्याने भर दिला जाणार असल्याचे श्री.कुलकर्णी यांनी सांागितले.

प्रत्येक व्यक्तीच्या मानात काय सुरु आहे. याचा शोध घेणे अवघड आहे. मात्र तरुण वर्गाची मानसिकता आत्महत्येकडे का जात आहे. याचा शोध घेतानाच सर्व शासकिय यंत्रणांना सोबत घेवून आत्महत्या रोखण्यासाठी सामुहिक काय प्रयत्न करता येतील याचा अभ्यास पोलीस दल करत आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेतला जाणार असल्याचे श्री.कुलकर्णी यांनी सांगितले.

आतापर्यंत ज्या आत्महत्या झाल्या आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारणांचा सखोल अभ्यास करण्याच्या सुचना सर्व प्रभारी अधिकार्यांना देण्यात आल्या आहे. केवळ आत्महत्येच्या गुन्ह्यापुरता तपास  न करता. त्यांची आत्महत्या करण्याची मानसिकता का झाली? याचा ही शोध तपासिक अधिकार्यांनी करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.