एस. टी. बसने रिक्षाला हुलकावणी दिल्याने रिक्षा पलटी होऊन 6 जण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील आगरनरळ येथील हनुमान नगर येथे एसटी बसने हुलकावणी दिल्याने रिक्षा चालकाने साईटपट्टीवरुन रिक्षा खाली उतरवल्याने रिक्षा पलटी होवून 6 जण जखमी झाल्याची घटना 27 ऑक्टोबर रोजी 11.55 वा. च्या सुमारास घडली. अपघात प्रकरणी एसटी चालक सुनील जोगदंड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद महेंद्र ढोंबरे (38, आगरनरळ, भोईवाडा, रत्नागिरी) यांनी जयगड पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक महेंद्र ढोंबरे हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेवून खंडाळा ते आगरनरळ असा प्रवास करत होते. रिक्षा हनुमाननगर येथे आली असता समोरुन देवूडमार्गे जाकादेवी आगरनरळ बस अतिवेगाने आल्याने रिक्षा चालकाने डाव्या बाजूच्या कच्चया सार्ईडपट्टीवर रिक्षा उतरवली. यावेळी रिक्षा पलटी होवून रिक्षातील महेंद्र यांची पत्नी, बहीण, मुलगा, भाचा व भाची असे 6 जण जखमी झाली. तसेच रिक्षाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले. महेंद्र ढोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी एस.टी. चालक सुनील जोगदंड याच्यावर भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.