बीएसएनएलच्या नवव्या सदस्य व्हेरीफिकेशनमध्ये बीएसएनएल एम्प्लॉयीज यूनियनचे घवघवीत यश

रत्नागिरी:- बीएसएनएल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या नवव्या सदस्य व्हेरीफिकेशनसाठी झालेल्या मतदानामध्ये रत्नागिरी जिल्हात बीएसएनएल एम्प्लॉयीज यूनियने घवघवीत यश संपादन केले. या निवडणूकीमध्ये रत्नागिरी जिल्हयामध्ये शंभर टक्के मतदान बीएसएनएल एम्प्लॉइज युनियनला झाले. तसेच राज्यपातळीवर व देश पातळीपर देखील सदर युनियनने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे.

याबाबत माहीती देताना रत्नागिरी जिल्हासचिव श्री. रणजीत पवार यांनी सांगितले, सदरील यश है सर्व कर्मचाऱ्यांनी रणजीत पवार (जिल्हासचिव) संजय पावसकर (जिल्हा अध्यक्ष), खजिनदार गुरव यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे प्राप्त झाले आहे. तसेच या निवडणूकीमध्ये संचार निगम एक्झिक्यूटीव असोसिएशनचे अध्यक्ष योगेश भोंगले, जिल्हासचिव नंदकुमार कदम, सौ. अमृता लेले यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले आहे.

आस्थापना विभागाकडून उपमहाप्रबंधक श्री. संजय कुलकर्णी, सचिन कांबळे, नंदकुमार कांबळे, ज्योती पाटील, मृणाल वाडेकर यांनी निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यास उत्कृष्ट कामगिरी केली. या पुढे रत्नागिरी जिल्हातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व बीएसएनएल सेवा सुरक्षीत होण्यासाठी आम्ही कटीबध्द असू असे आश्वासन रत्नागिरी जिल्हा सचिव रणजीत पवार यांनी दिले.