गुरुजींच्या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाच्या प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा 

रत्नागिरी:- राज्यातील आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करत रिक्त जागांवर संबंधीत शिक्षकांना समुपदेशनाने नेमणुका दिल्या आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद पातळीवर जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळताच गुरूर्जीच्या जिल्ह्यातंर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. यामुळे यंदाच्या बदल्यांकडे शिक्षक नजरा लावून आहेत. मात्र, दरवर्षी होणार्‍या मे अथवा जून महिन्यांत होणार्‍या शिक्षकांच्या बदल्यांना ऑक्टोबर महिना उजाडला तरी अद्याप मुहूर्त लागलेला नाही. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शिक्षकांच्या बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत केली असून या प्रणालीची चाचणीत मोठा कालावधी गेला. त्यानंतर रखडत रखडत आंतरजिल्हा बदली शिक्षकांची प्रक्रिया पार पडली. ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ऑनलाईन बदल्याची प्रक्रिया घेणार्‍या संबंधीत एजन्सीने नव्याने जिल्हातंर्गत बदल्यासाठी शिक्षकांकडून माहिती घेतली आहे.
आता शिक्षकांच्या बदल्याची फाईल अंतिम मान्यतेसाठी ग्रामविकास विभागार असून ग्रामविकास मंत्र्यांन हिरवा कंदील दाखवताच जिल्ह्यातंर्गत बदल्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. हीप्रक्रिया सुरू झाल्यानंतर संबंधीत शिक्षकांन यापूर्वी ऑनलाईन भरलेली माहिती, त्यानंत केलेल्या दुरूस्त्या हे पाहता येणार आहे. यात काही त्रुटी असल्यास पुन्हा दुरूस्तीसाठी काही कालावधी देण्यात येणाआहे. त्यानंतर संवर्ग एक यांना बदली हवी के नको याबाबत विचारणा होणार आहे.  यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने यंदा शिक्षकांच्या बदल्या होत की नाही, याबाबत काही शिक्षकांच्या मनार संभ्रम अवस्था आहे. 

साडेपाच हजार शिक्षकांनी भरली ऑनलाईन माहिती
रत्नागिरी जिल्हा परिषदेने सुमारे 5 हजार 500 शिक्षकांची माहिती ऑनलाईन सादर केली आहे. होणार्‍या बदल्यांमध्ये चार प्रकार असणार आहेत. विशेष संवर्ग 1, विशेष संवर्ग 2, बदली अधिकार पात्र आणि बदली पात्र असे चार प्रकार यामध्ये असणार आहेत. दोन दिवसात पोर्टल सुरु होणार आहे. त्यानंतर शिक्षकांना लॉगिन सुरु होऊन आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल. त्यावर शिक्षकांना काही प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या प्रश्नाच्या उत्तरांच्या आधारे बदलीसाठी पात्र असणार्‍या शिक्षकांची चार प्रकारात विभागणी करण्यात येणार आहे.

आंतरजिल्हा बदल्यांना रत्नागिरीत रेड सिग्नल
राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी आंतरजिल्हा बदल्यांच्या प्रक्रियेसाठी ऑनलाईन यादी जाहीर केली आहे. त्यानुसार प्रक्रियेलासुद्धा राज्यात सुरूवात झाली. जिल्ह्यात 400 जणांची यादी जाहीर झाली होती. असं असलं तरी जिल्ह्यात रिक्त पदांची संख्याही 17 टक्के आहे. नियमानुसार 10 टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असतील तर या आंतरजिल्हा बदल्यांना स्थगिती असते. त्यानुसार सध्या तरी बदल्यांना रेड सिग्नलच आहे. राज्यात मात्र ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.