परटवणे येथे २ ऑक्टोबर रोजी ढोलवादन स्पर्धेचे आयोजन 

रत्नागिरी:- श्री नवरात्रौत्सव मंडळ परटवणे आयोजित तालुकास्तरीय ढोलवादन स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी परटवणे साई मंदिर येथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे. 

श्री नवरात्रोत्सव मंडळ परटवणे यांच्यावतीने रविवार दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी तालुकास्तरीय ढोलवादन स्पर्धेेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७ हजार ७७७ व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ५ हजार ५५५ व सन्मानचिन्ह तसेच तृतीय ३ हजार ३३३ व सन्मानचिन्ह असे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या सर्धेसाठी उत्कृष्ट ढोलवादक व उत्कृष्ट ताशावादक यांना रोख रक्कम १ हजार १११ व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. 

या स्पर्धेत सहभागी होणार्‍या संघांनी २ ऑक्टोबर रोजी सायं. ६.३० वाजता परटवणे साई मंदिर येथे उपस्थित रहावे तसेच स्पर्धेच्यावेळी पंचांचे निर्णय अंतिम राहणार आहेत. तसेच गैरवर्तन करणार्‍या संघाला बाद ठरवण्यात येईल. या स्पर्धेसाठी सुमित धुळप (८८५०४९१४८१) व प्रणव रजपूत (९२८४२१३२९९) यांच्याशी संपर्क साधावा. नावनोंदणी करणार्‍या संघांनाच स्पर्धेमध्ये प्राधान्य दिले जाईल.