जुन्या नोटांसह एकजण पोलिसांच्या ताब्यात

मंडणगड:- मंडणगड स्थानक परिसरात चार लाखांच्या जुन्या चलनी नोटा जप्त करीत एका व्यक्तीवर रत्नागिरीतील एलसीबीसह स्थानिक पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कायदेशीररित्या जुन्या नोटा चलनात आणण्यासाठी प्रतिबंधित झाल्या असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटा नोट आढळून आल्याने या नोटा नेमक्या कोठे नेण्यात येत होत्या, याचा तपास पोलिस आहेत. या बाबत मंडणगड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता आसिफ खान (४०) मूळ राहणार कुडकी, सध्या रा. वडवली ता. श्रीवर्धन यांच्या चारचाकी टाटा नॅनो कारमध्ये रा. वडवली ता. श्रीवर्धन यांच्या चारचाकी टाटा नॅनो कारमध्ये १००० रुपयांच्या दर्शनी मूल्य असणाऱ्या ३०० नोटा, ५०० रुपयांच्या दर्शनी मूल्य असणाऱ्या १९५ नोटा असा एकूण ३ लाख ९७ हजार ५०० रुपयांच्या नोटा आढळून आल्या.

केंद्र सरकारने नोट बंदीनंतर दिलेल्या कालावधीत या नोटा बदलून न घेता माहित असतानाही चालनातून बंद झालेल्या नोटांचा अवैधरित्या साठा केल्याचे आढळून आले. तालुक्यात अशा प्रकारे बंद झालेल्या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, या नोटा नक्की कुणाच्या आहेत? त्या मंडणगड मध्ये कशा आल्या? या बाबत पोलिसांनी आसिफ याला विचारणा केली असता त्याने समर्पक उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. मात्र या नोटा बदलण्यासाठी मंडणगड येथे आल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. याबाबत रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या नोटा नेमक्या कुठून कोठे जात होत्या, याचा सखोर तपास पोलिस करीत आहेत.