व्हर्जन दोन या अ‍ॅपमार्फत होणार ई-पीक पाहणी

रत्नागिरी:- विविध शासकीय योजना, पिक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीने शेतीचे नुकसान झाल्यास ई-पीक पाहणीची नोंद असणे आवश्यक आहे. यासाठी ई-पीक पाहणी व्हर्जन- दोन हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्या माध्यमातून नोंद करावी. शेतकर्‍यांना काही अडचणी असल्यास मंडल अधिकारी, तलाठ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभगाने केले आहे.

शेती योजनांच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकर्‍यांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून पीक पाहणीची नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये माहिती भरता येते. शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी नोंद करताना फोटो घेतील त्यावेळी त्या गटाच्या मध्यबिंदूचे अंतर अज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी ई- पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल पमध्ये दर्शविण्यात येणार आहे.

नोंदविलेली माहिती चुकीची असल्यास 48 तासात दुरुस्तीही करता येते. नोंद करताना शेतकर्‍यांना किमान आधारभूत योजनेंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे का, असा प्रश्न विचारला जाणार असून, त्यावेळी होय म्हणून माहिती भरावयाची
आहे.

अशा सर्व शेतकर्‍यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला देण्यात येणार असून, पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत अशा शेतकर्‍यांची नोंदणी आपोआप होणार आहे. या अ‍ॅपमध्ये मुख्य पीक व तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधाही आहे, असे आवाहन कृषी विभगातर्फे करण्यात आले आहे.