दहा दिवसानंतरही स्वप्नाली सावंत बेपत्ताच; सलग दुसऱ्या दिवशी मिऱ्या येथे सर्च ऑपरेशन 

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.स्वप्नाली  सावंत या बेपत्ता झाल्याला दहा दिवस उलटल्यानंतरही त्या न सापडल्याने आता शहर पोलीसांनी तपासाची गती वाढविली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मिऱ्या येथील स्वप्नाली सावंत यांच्या घर परिसरात पोलीसांनी पुन्हा सर्च केला आहे. त्यांचा घातपात झाल्याचा संशय वाढत चालला असून पतीसह दोघांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दि.१ सप्टेंबरला मिऱ्या येथील राहत्या घरातून स्वप्नाली सावंत बेपत्ता झाल्याची तक्रार पती सुकांत सावंत यांनीच शहर पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानंतर  पोलीसांनी तपासा दरम्यान चौकशीचे लक्ष पती सुकांत सावंत यांच्याकडेच वळविले होते. यापुर्वी पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. यातून अनेक तक्रारी व गुन्हे शहर पोलीस स्थानकात दाखल आहेत. तर अनेक गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत.स्वप्नाली सावंत यांचा ठवठिकाणा अध्याप लागलेला नाही. पतीकडून पोलीसांनी काढलेल्या माहितीमुळे त्याचा घातपात झाल्याची शक्यता अधिक वाढली आहे. मात्र त्या अध्याप  न सापडल्याने पोलीसांनी सर्व दिशेने तपास सुरुच ठेवला आहे. स्वप्नाली सावंत कुठे असू शकतीला अशा सर्व ठिकाणाचा शोध पोलीसांनी  सुरुच ठेवला आहे. पोलीसांचे एक पथक मिऱ्या येथेच तळ ठोकून आहे. मात्र दहा दिवस होवून गेल्याने स्वप्नाली सावंत यांच्या बेपत्ता होण्यामागील गुढ वाढले आहे.