वामन द्वादशीला जिल्ह्यात १ हजार ९४२ बाप्पांचे विसर्जन 

रत्नागिरी:- जिल्हाभरात बुधवारी वामन द्वादशीला १ हजार ९४२ खाजगी आणि ९ सार्वजनिक बाप्पांना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया… अशा गजरामध्ये जिल्ह्यात भव्य मिरवणुकांनी आराध्य दैवताला भक्तांनी निरोप दिला. शुक्रवारी अनंत चतुर्थीला ३७ हजार ८४१ मुर्त्यांचे विसर्जन होणार आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात गणेश चतुर्थीला सुमारे १ लाख ६८ गणेशमूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. वाजत गाजत घरी आलेल्या १० हजार गणरायांना पहिल्या दीड दिवसांनी निरोप देण्यात आला. त्यानंतर गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा झाला. या वर्षी सर्वांच्या घरी सात दिवस बाप्पांनी मुक्काम केला. गणेशोत्सवाच्या या काळामध्ये सर्व भाविकांनी आराध्य गणपतीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना आणि पूजा अर्चा केली. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी गौरी विसर्जनाबरोबरच गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. 

बुधवारी जिल्ह्यातील सुमारे नऊ दिवसांच्या मुक्कामी बाप्पांना निरोप देण्यात आला. यामध्ये ९ सार्वजनिक आणि १ हजार ९४० गणरायांना निरोप देण्यात आला. यापैकी रत्नाागिरी शहरामधील ४ घरगुती तर ५ सार्वजनिक गणेशेमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात ६५ घरगुती गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. जयगड परिसरात १०२ घरगुती आणि १ सार्वजनिक, संगमेश्वर २८ घरगुती, राजापूर ४६५ घरगुती आणि १ सार्वजनिक, नाटे १५ घरगुती, देवरूख १४१, गुहागर १२५ घरगुती, अलोरे ५० घरगुती, खेड १७ घरगुती, दापोली १०५ घरगुती, पूर्णगडमध्ये ७९५ खासगी आणि दाभोळमध्ये २६ खासगी गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.