एटीएम फोडणारे चोरटे कॅमेऱ्यात कैद मात्र चेहऱ्यावर मास्क; पोलिसांसमोर नवे आव्हान 

चिपळूण:- चिपळूण शहरातील गजबजलेल्या भोगाळे परिसरातील युनियन बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १४ लाखाची रोख रक्कम गुरुवारी पहाटे लंपास केली आहे. ऐन गणेशोत्सवात हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद असले तरी त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. 

चोरट्यांची सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार असून ते चार ते पाचजण असावे, असा प्राथमिक अंदाज असून कार कोणत्या रस्त्याने गेली. यासाठी सर्व रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई येथे ठाण मांडून बसल्या आहेत. युनियन बँकेकडून एटीएम मॅनेजर संतोष काशिराम झगडे यांनी याबाबतची फिर्याद चिपळूण पोलीस ठाण्यात दिल्यानुसार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोगाळे येथे युनियन बँकेच्या शाखेच्या परिसरातच बँकेचे एटीएम सेंटर आहे. बुधवारी गणेशोत्सवानिमित्त बँकेला सुट्टी होती. ही संधी साधून चोरट्यांनी पहाटे एटीएम फोडले