अपघाताची पाहणी करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला दुचाकीची धडक

रत्नागिरी:- अपघाताची पाहणी करण्यासाठी उभ्या करून ठेवलेल्या पोलिसांच्या गाडीलाच एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली आहे. पोलिसांनी तरूणविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेट नंबर 2 बाहेर एका अपघाताची पाहणी करण्यासाठी उपनिरिक्षक आकाश साळुंखे हे थांबले होते. यावेळी दुचाकीस्वार देवेंद्र दिनेशचंद्र सिंग (ऱा उत्तरपदेश, सध्या रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील दुचाकीने पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिल़ी. या धडकेत पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले. पोलिसांनी देवेंद्र सिंग याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आह़े. ही घटना 28 ऑगस्ट 2022 रोजी घडली.