खेडमध्ये भंगारच्या गोडाऊनमध्ये भीषण स्फोट; एकजण जागीच ठार

खेड:- खेड शहरातील  लोकवस्तीने गजबजलेल्या महाडनाका येथे असलेल्या  भंगार गोडाऊन मध्ये गॅस कटरने केमिकलचा ड्रम कट करत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका ३० वर्षीय पर प्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली 

छोटू असे त्या जागीच गतप्राण झालेल्या तरुणाचे नाव आहे  महाड नाका वैश्य भवन  नजीक असलेले भंगार

गोडावून आहे या ठिकाणी भंगार मधील अनेक वस्तू अस्तव्यस्थ पडलेल्या असतात सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास छोटू नामक हा पर प्रांतीय कामगार गॅस कटर च्या साहाय्याने केमिकल चा ड्रम कट करत होता मात्र अचानक झालेल्या स्फोटात छोटू हा तरुण जागीच गतप्राण झाला त्याला तत्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले दरम्यान या घटने नंतर येथील पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला 

दरम्यान महाड नाका लोकवस्ती असलेल्या परिसरात   भंगार डेपो बाबत येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्या प्रकरणी येथील नागरिकांनी ही घटना घडण्या अगोदर पासून आवाज उठवत आले आहेत मात्र प्रशासना कडून कोणतीच ठोस कारवाई झाली नव्हती मात्र स्फोट होऊन तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी येथील प्रश्न पून्हा ऐरणीवर आला आहे.