पूर्णगड येथे अल्पवयीन मुलाच्या पायावर चढवली कार

रत्नागिरी:- अल्पवयीन मुलाच्या पायावर कार चढवत अपघात केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना सोमवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ वा. महाकाली पॅलेस समोरील जयभवानी बेकरीजवळ घडली होती.

याबाबत आरती आनं ठिकरे (३९,रा.पावस धनगरवाड,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानूसार,सोमवारी दुपारी त्यांचा मुलगा हर्षद ठिकरे (११) हा महाकाली पॅलेससमोरील जयभवानी बेकरीजवळ शाळेत जाण्यासाठी उभा होता.तेव्हा (एमएच-१२-जे-१७३६) कारवरील अज्ञात चालकाने त्याच्या डाव्या पायावरुन कार नेउन अपघात केला.याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.