स्मार्ट प्रकल्पांतर्गत 15 पैकी 11 प्रस्ताव तयार 

रत्नागिरी:- स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्याला १५ चे उद्दीष्ट दिले होते. त्यातील ११ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. अजुनही चार प्रस्ताव मिळालेले नाहीत. त्यासाठी ऑफलाईन पध्दतीने शेतकरी संस्थांना अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती स्मार्ट योजनेचे नोडल अधिकारी अजय शेंडे यांनी दिली.

स्मार्ट प्रकल्पांतर्गत समुदाय आधारित संस्थांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी देऊन लाभ देण्यासाठी जिल्हानिहाय ९०० चा लक्षांक देण्यात आला आहे. त्याकरिता ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. जिल्ह्यांना दिलेल्या उद्दीष्टापैकी स्वीकृत अर्जापैकी चारही निकष पूर्तता करणा-या लाभार्थ्यांच्या अर्जांना प्राथमिक मान्यता दिलेली आहे. परंतु अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये दिलेले पूर्ण केलेले नाही. त्या जिल्ह्यात लक्षांक साध्य करण्यासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी परवानगी दिली आहे. जिल्हास्तरावर ऑफलाईन पद्धतीने ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत नवीन अर्ज स्वीकृतीसाठी परवानगी देण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांनी सिबिओ निवडीचा लक्षांक साध्य केला आहे किंवा उपलब्ध अर्जामधून जिल्हा लक्षांक पूर्ण होऊ शकतो अशा जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत नवीन अर्ज स्वीकारू नयेत असे राज्य शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आवश्यक कागदपत्रासह संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला १५ चे उद्दीष्ट दिले होते. त्यातील ११ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. अजुनही चार प्रस्ताव मिळालेले नाहीत. त्यासाठी ऑफलाईन पध्दतीने शेतकरी संस्थांना अर्ज करता येणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.