टाकुन गेलेले भक्ष्य खाण्यासाठी बिबट्या पुन्हा हजर; ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण

साखरपा:- साखरपा गुरववाडीत  बिबट्याने रात्री वासराची शिकार करत पळवून नेले. मात्र अर्धवट मृत अवस्थेत असलेल्या वासराला टाकून तो पसार झाला. पहाटे नंदकिशोर (बाबू) लिंगायत साखरपा पाटोळेवाडी यांच्या  मालकीचे घराच्या अंगणात हि घटना घडली. 

घटनेचे गांभीर्य ओळखून वाडीतील सुरज लिंगायत यांनी जवळील वन विभाग कर्मचारी सुरज तेली यांना माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी तत्काळ येऊन पंचनामा केला व मृतदेहाची विल्हेवाट लावली. मात्र अर्धवट स्थितीत टाकलेले भक्ष्य असल्याने अतृप्त असलेला बिबट्या सायंकाळी ६ च्या सुमारास त्याच ठिकाणी पुन्हा त्याची शिकार न्यायला आलेला दिसून आला.  

यावेळी पाटोळेवाडीतील सर्व लोकांनी प्रथमदर्शनी पाहिला व आपल्या मोबाईल मध्ये त्याचे फोटो व व्हिडिओ कैद केले. मात्र ही घटना तेथील स्थानिक नागरिकासाठी धोकादायक आहे. यामुळे वनविभाग यांच्याकडून वारंवार बिबट्या घरा जवळ येत असल्याने दखल घ्यावी अशी सर्व ग्रामस्थांनची मागणी आहे.त्यामुळे वनविभागाने यावर ताबडतोब कार्यवाही करणे गरजेचे आहे.