जनावरांच्या पालनासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान

रत्नागिरी:- जिल्हा परिषद सेस 50 टक्के अनुदानावर सुधारित गाई, म्हैशी, पाड्यांचा पुरवठा योजनेसाठी 20 हजार रुपये अनुदान व जिल्हा परिषद सेस 50 टक्के अनुदानावर शेळी गट 5+1 पुरवठा योजनेसाठी 19 हजार रुपये अनुदान मिळत आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड सत्यप्रत, रहिवासी दाखला (सरपंच/ग्रामसेवक), अपत्य दाखला (स्वयंघोषणापत्र), दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला, रेशनकार्ड, बंधपत्र (प्रस्ताव मंजूर झाल्यावर विहीत नमुन्यात), सातबारा उतारा, सातबारावर नाव नसल्यास नावे असणार्‍यांचे संमतीपत्र). बँकेचे पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. जिल्हा परिषद सेस 90 टक्के अनुदानावर स्वच्छ गोठ्याकरिता रबरमॅट पुरवठा करणे या येाजनेसाठी तीन हजार रुपये अनुदान मिळत असून आधारकार्ड सत्यप्रत, रहिवासी दाखला (सरपंच/ग्रामसेवक), अपत्य दाखला (स्वयंघोषणापत्र), दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला, रेशनकार्ड बँकेचे पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत (75 टक्के (अनुदान) दोन दुधाळ जनावरे गट पुरवठा अनुदान रक्कम 63 हजार 796 रुपये : आवश्यक कागदपत्रे-आधार (फोटो ओळखपत्र सत्यप्रत). दारिद्रयरेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला. दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत. अपत्य दाखला (स्वयंघोषणा पत्र), रहिवासी दाखला (सरपंच/ग्रामसेवक), जातीचा दाखला अनिवार्य, रेशनकार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स सातबारा उतारा, बंधपत्र (प्रस्ताव मंजूर झाल्यावर विहीत नमुन्यात), शैक्षणिक अर्हता दाखला, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र छायांकीत प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत (75 टक्के अनुदान) शेळी गट 10+1 पुरवठा 58 हजार 673 रुपये अनुदान रक्कम मिळत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार (फोटो ओळखपत्र) सत्यप्रत आवश्यक आहे. शिवाय दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला, शेळीपालन प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत. अपत्य दाखला (स्वयंघोषणा पत्र), रहिवासी दाखला. (सरपंच/ग्रामसेवक), जातीचा दाखला अनिवार्य, रेशनकार्ड, बँकेचे पासवक झेरॉक्स, 7/12 उतारा (7/12 वर नाव नसल्यास नाव असणार्‍याचे संमतीपत्र), बंधपत्र (प्रस्ताव मंजूर झालेवर विहित नमुन्यात), शैक्षणिक अर्हता दाखला, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र छायांकीत प्रत.