जेष्ठ नागरिकांसाठी एसटीला अतिरिक्त पायरी बसवा; युवा सेनेची मागणी

रत्नागिरी:- रत्नागिरी एसटी विभागाअंतर्गत चालविण्यात येणार्‍या शहर वाहतुकीच्या बसेसना असलेल्या पायर्‍या रस्त्यापासून जास्त उंचीवर असल्याने जेष्ठ नागरिकांना बसमध्ये चढणे अशक्य होत आहे. त्यामुळे त्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतो.याचा आर्थिक भुर्दंड जेष्ठ नागरिकांना बसत असल्याने बसेसना अतिरिक्त पायरी लावण्याची मागणी युवा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शुक्रवारी तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत यांनी

याबाबतचे लेखी निवेदन एसटीच्या अधिकार्यांना दिले आहे.रत्नागिरी शहर वाहतुकीच्या बसेस शहरासह ग्रामीण भागात प्रवास करतात. ग्रामीण भागातून अनेक जेष्ठ नागरिका कामानिमित्त शहरात येत असतात. मात्र शहर वाहतुकीच्या बसेसची पहिली पायरी रस्त्यापासून जास्त उंचावर असल्याने जेष्ठ नागरिकांना बस मध्ये चढणे अशक्य होते. त्यामुळे त्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. जेष्ठ नागरिकांचा आर्थिक भुर्दंड कमी  करण्यासाठी एसटी बसेसना रस्त्यापासून कमी उंची वर अतिरिक्त पायरी बसविण्यात यावी अशी मागणी युवा सेनेने केली आहे. शुक्रवारी एसटीच्या अधिकार्यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत, आशिष चव्हाण, दुर्गेश साळवी,  निखिल बने, पारस पाटिल, तरुण शिवलकर, धनराज चव्हाण, हितेश बिर्जे, पारस साखरे, ओमकार पाटिल, ओम सावंत आदी उपस्थित होते.