तेली आळीतील अपार्टमेंटमधील जुगार अड्ड्यावर धाड; 11 जणांची टोळी अटकेत 

रत्नागिरी:- शहरातील तेली आळी येथील अनिकेत अपार्टमेंट येथे चालणाऱ्या जुगार अड्डयावर धाड टाकण्यात आली. सोमवारी ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. या धाडीत ११ जणांवर कारवाई करण्यात आली. यात 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राजाराम चव्हाण (४८, रा. कूर्धे पावस), चंद्रशेखर शंकर पावसकर (५९, रा. निवखोल), रशिकांत मधूकर पिलणकर (५०, रा. फणसोप, टाकळेवाडी), प्रविण प्रभाकर नाचणकर ( ४५, रा. तेली आळी), प्रकाश भास्कर नाखरेकर (६४, रा. आठवडा बाजार), गणेश शंकर भाटकर (३७, भाटीमिर्‍या दत्तमंदीर), बशीर अली मिरकर (६५, रा. कर्ला), विजय शिवराम खानविलकर (६२, रा. झाडगाव नाका), अब्दुल अजीज पडवेकर (६७, रा. धनजीनाका), पंढरी मुंकुंद खलपे (८२, रा. गुढेवठार), कृष्णा महादु मांडवकर (७०, रा. कालरकोंड, नाखरे) व मुख्य म्होरक्या चालवणारा अनिकेत शेटये याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकाॅन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहीतकुमार गर्ग यांच्या आदेशानुसार शहरातील तेली आळी येथे मटका व्यवसाय चालु असल्याची माहीती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य, दत्ता शेळके, पोलीस अंमलदार अजय कांबळे व मोहन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी छापा टाकला असता ५५ हजारांचा मुद्देमाल व आॅनलाईन जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेले ७ मोबाईल असा एकूण 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके करत आहेत.