गणेशोत्सवासाठी कोरे मार्गावर धावणार नागपूर-मडगाव विशेष

रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकणात व कोकणातील प्रवाशांना विदर्भात येण्या-जाण्यासाठी मध्य रेल्वेकडुन नागपुर मडगाव गाडी सोडण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. २४ ऑगस्ट रोजी या रेल्वे गाड्या सुटणार आहेत.

गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेली ही गाडी नागपूर जंक्शन रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.५ वाजता सुटेल  आणि दुसर्‍या दिवशी मडगाव येथे ५.३० वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास मडगाव येथुन रात्री ९.३० वाजाता सुटणार आहे. ती गाडी दुसर्‍या दिवशी नागपूर येथे सायंकाळी ७ वाजात पोहोचेल. या रेल्वेसेवेला नागपूर जं, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला जं, मलकापूर, भुसावळ जं, नाशिक, इगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी मडगाव स्थानकावर थांबा देण्यात आले आहेत. ही गाडी बुधवार, शनिवारी २८ जुलै ते २९ सप्टेंबर चालवण्यात येत आहे. तिचा परतीचा प्रवास मडगाववरून गुरूवार, रविवारी दोन दिवस २९ जुलै ते २९ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे.