प्रौढाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी एसटी चालकावर विरोधात गुन्हा 

रत्नागिरी:- बेदरकारपणे एसटी चालवून समोरुन येणार्‍या दुचाकीला धडक देत त्यावरील प्रौढाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी एसटी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात पावस ते गावडे आंबेरे जाणार्‍या रस्त्यावरील स्वामि भक्तनिवास येथील वळणावर शुक्रवार 8 जुलै रोजी सकाळी 10 वा.सुमारास घडला होता.

माणिक गंगाधर दहीफळे (38,रा.माळनाका,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. या अपघातात विनित अनिल गोताड (50, रा.गवळीवाडा, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला होता.त्यानूसार,शुक्रवारी सकाळी तो आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-14-बीटी-0180) घेउन हर्चे-पावस ते रत्नागिरी असा भरधाव वेगाने येत होता.त्याच सुमारास विनित गोताड आपल्या ताब्यातील होंडा शाईन (एमएच-08-एआर-0046) घेउन पावस ते गावडे आंबेरे असे जात होते.ही दोन्ही वाहने स्वामी भक्तनिवास येथील वळणावर आली दळीफळेचा एसटीवरील ताबा सूटला आणि त्याने समोरुन येणार्‍या एसटीला धडक देत अपघात केला.ही धडक इतकी जोरदार होती कि त्यात विनित गोताड यांचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला होता.याबाबत शनिवारी एसटी चालकाविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.