दक्षिण मनसेतील पदाधिकारी निवडीनंतर अंतर्गत वाद उफाळला

रत्नागिरी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या नव्या निवडीवरुन अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नव नियुक्त जिल्हा संपर्क अध्यक्ष सतिश नारकर यांनी केवळ एकाच दौर्‍यानंतर अहवाल तयार करुन कार्यकारणीत फेरबदल केले होते. मात्र जून्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात न घेता केल्या नियुक्त्या वादात सापडल्या आहे. तर नव्या नियुक्त्या करताना सतिश नारकर यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तींना पदे दिल्याचे थेट आरोप मनसेच्या बैठकीत पदाधिकार्‍यांनी केला आहे. त्यामुळे मनसेच्या दक्षिण रत्नागिरीत दोन गट पडले आहेत. त्यामुळे हा वाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोर्टात जाण्याची शक्यात आहे.

मनसेचे नवनियुक्त जिल्हा संपर्क अध्यक्ष सतिश नारकर यांनी  पहिल्या जिल्हा भेटी दौर्‍यानंतर तयार केलेल्या अहवालात पक्षाअंतर्गत बदल करण्याची सुचना वरिष्ठाना केली होती. त्यानुसार नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र नव्या नियुक्त्या करताना पदाधिकार्यांना विश्वासात न घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. शुक्रवारी शहरातील साईमंगल कार्यालयात दक्षिण रत्नागिरीची बैठक झाली. यावेळी पदाधिकार्‍यांनी नव्या नियुक्तीचा विषय चर्चेला घेवून स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.पक्षासाठी गेली अनेक वर्ष काम करणारे पदाधिकारी आहेत. असे असताना जिल्हा संपर्क अध्यक्ष सतिश नारकर यांनी परस्पर निर्णय घेत फेरबदल सुचविले होते. त्यानुसार तात्काळ नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र नियुक्त्या करताना पक्षाचे निष्ठेने काम करणार्‍या पदाधिकार्‍यांना डावलून मर्जीतील व्यक्तींना पदे वाटल्याचा आरोप काहि पदाधिकार्‍यांनी बैठकीत केला.अन्यायकारक झालेल्या नियुक्त्यांबाबत पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून त्यांच्या वस्तुस्थिती लक्षात आणूण देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पक्षाध्यक्षांकडे कैफियत मांडण्यापुर्वी नव्या पदाधिकार्‍यांना सहकार्य न करण्याची भूमिका मनसेच्या जून्या पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.नव्या जिल्हा संपर्क अध्यक्षांच्या निवडीनंतर आता मनसे वाढीपेक्षा मनसे फुटीच्या उंबरट्यावर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनसेत उघडउघड दोन गट पडल्याचे चित्र ऐन निवडणूकांच्या तोडावर निर्माण झाले आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे मनसेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.