वेळास समुद्रकिनारी टॅग केलेले ‘प्रथमा’ कासव नॉट रिचेबल

रत्नागिरी:- जानेवारी २०२२ या कालावधीत वेळास समुद्रकिनारी टॅग केलेल्या ‘प्रथमा’ कासवाचा आता सिग्नल मिळत नसल्याचे दिसून येत आहे.  उपग्रह ट्रान्समीटरमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रसारण थांबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘प्रथमा’ने आतापर्यंत २७०० किमीचे अंतर कापले आहे. प्रथमाचे शेवटचे स्थान कुणकेश्वर, सिंधुदुर्गच्या किनाऱ्यापासून ६० किमी अंतरावर होते. वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर किनार्‍यांवरुन सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांचा प्रवासाची माहिती सातत्याने दर आठवड्याला दिली जात आहे.

याआधी गुजरातच्या सागरी हद्दीत विहार करणारे ‘प्रथमा’ कासवाचा महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास सुरु झाला आणि त्यानंतर ‘प्रथमा’  वेळास समुद्रकिनारी परतली होती. २५ जानेवारी २०२२ रोजी वेळास समुद्रकिनारी टॅग केलेल्या ‘प्रथमा’ कासवाचा सिग्नल आता मिळेनासा झाला आहे. उपग्रह ट्रान्समीटरमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रसारण थांबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रथमाचे शेवटचे स्थान कुणकेश्वर, सिंधुदुर्गच्या किनाऱ्यापासून ६० किमी अंतरावर होते. आता सिग्नल मिळत नसल्याने प्रथमा कासव नेमके कुठे आहे, हे आता कळत नसल्याचे चित्र आहे.