पावसाची प्रतीक्षा तरीही रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीचा शुभारंभ

रत्नागिरी:- कोकणात अजूनही मान्सूनची पतिक्षा असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्वच्या सरी बरसू लागल्या आहेत. उत्तर रत्नागिरीसह काही भागात होत असलेल्या या पावसामुळे येथील बळीराजाची खरीपाची लगबग सुरू झालेली आहे. मान्सूनपूर्व असला तरी लवकरच मान्सून होण्याचा अंदाज घेत येथील काही शेतकर्यांनी रोहिणी नक्षत्राच्या मुर्हूतावर खरीपाच्या भात पेरण्यांना पारंभ केला आहे आहे.

खरीप हंगामासाठी सध्या 82 हजार 754 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्याचे नियोजन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे. यंदा या हंगामासाठी 6141 क्विंटल बियाणे व 14,640 मेट्रीक टन खताची गरज लक्षात घेत नियोजन झाले आहे. शेतकर्यांना वेळेवर बियाण्यांचा व खतांचा पुरवठा होईल तसेच यात कोणतीही साठेबाजी होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी यासाठी पशासनस्तरावर दक्षता घेण्यात येत आहे. प्रशासनाला त्याबाबतचे सक्त निर्देश केले आहेत.

जिल्ह्यात लागवडीयोग्य क्षेत्र 3 लाख 98  हजार 404 हेक्टर आहे. यातील 91  हजार 992  हेक्टर क्षेत्रावर खरीप पिक लागवडीचे नियोजन करण्यात आलेले आहे. होणार्या लागवडीपैकी  80 टक्के क्षेत्रावर भातपिकाची तर 15 टक्के क्षेत्रावर नागली पिकाची लागवड प्रस्तावित आहे. इतर क्षेत्रात भाजीपाला व कडधान्य पिकविला जातो. सध्या करण्यात आलेल्या नियोजनात 82 हजार 754 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड या खरीप हंगामात करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात बियाणे विक्रीवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथक नेमण्यासह 10 ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सध्या नोंदणीकृत 346  विकेत्यांपैकी 190 विकेते पॉस चा वापर करीत आहे. जिल्ह्यात एकूण 801 शेतकरी गट असून त्यांना बांधावर खत वाटप अंतर्गत 121 टन खत वाटपाचे नियोजन कृषि विभागामार्पत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा बळीराजाला लागली आहे. खरा मान्सून सुरू होताच येथील खरीपाच्या कामांनाही गती येईल. पण सद्या मात्र मान्सूनपूर्व च्या सरींची बरसात जिल्हाभरात अनेक भागात होताना दिसत आहे. अधूनमधून पडणाऱया या पावसाच्या सरीमुळे अनेक भागात शेतकरी ‘पेरते’ झाला आहे. काही भागात धुळ पेरण्या तर काही भागात नियमित भात पेरण्यां देखील सुरू झालेल्या दिसून येतात. शेतात नांरगणी करून पेरणीच्या कामांत बळीराजा गुंतल्याचे चित्र उत्तर रत्नागिरीच्या अनेक भागात दिसून येत आहे.