पर्यटकावर प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयिताना जामीन मंजूर

खेड:-हर्णै समुद्र किनान्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबलेल्या पिंपरी चिंचवड येथील पर्यटक तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संशयित आरोपींना येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संशयितांच्या वतीने खेड येथील प्रसिद्ध विधिज्ञ ऍड. सुधीर बुटाला यांनी काम पाहिले.

 शुभम परदेशी (वय २९), सूरज काळे (वय २५) व अन्य तिघे पर्यटक हर्णे समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, रविवारी १५ मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते पुण्याकडे जायला निघाले होते. त्याचवेळी सुराली गार्डनजवळ एक इनोव्हा गाडी रस्त्यावर लावण्यात आल्याने गाडी बाजूला कर, असे सांगितले. आपल्याला गाडीला बाजूला कर असे सांगितल्याचा राग मनात धरून पाठलाग करत टोळक्याने कोयत्याने हल्ला चढवला. शुभम परदेशी, सूरज काळे या हल्ल्यात जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित म्हणून हॉटेल सुराली गार्डनच्या भारत वामन मुळे (वय ४६, व्यवसाय हॉटेल, रा. गिम्हवणे, दापोली), अंकुर अरुण माने (२६ रा. ओंकार सदन, काळकाईकोंड दापोली) व सोनल सुधाकर अंबिये ( ५३, रा. सुराली गार्डन, गिम्हवणेता. दापोली) या | तिघांना शुभम माधव परदेशी (वय २९, रा. गणेशनगर, डांगे चौक चिंचवड पुणे) यांच्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. संशयितांच्यावतीने ऍड. सुधीर बुटाला यांनी युक्तिवाद करून सर्व संशयितांना खेडच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन मिळवून दिला.